आरटीईअंतर्गत जिल्ह्यात चार हजार 479 जागा उपलब्‍ध


RTE Admission 2020 Details

RTE Admission 2021 : In the Nashik district under RTE Four thousand 479 seats available – शिक्षणाचा हक्‍क कायद्यांतर्गत खासगी शाळांमध्ये राखीव प्रवर्गातील व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी २५ टक्‍के जागांवर मोफत प्रवेशाची प्रक्रिया लवकरच सुरू होत आहे. याअंतर्गत शाळांसाठी नोंदणी प्रक्रिया सुरू होती. शैक्षणिक वर्ष २०२०-२१ करिता नाशिक जिल्ह्यात ४४१ शाळांनी नोंदणी केली असून, त्‍यानुसार चार हजार ४७९ जागा प्रवेशासाठी उपलब्‍ध असणार आहेत.

आरटीईअंतर्गत राज्‍यात सात हजार २७१ शाळांनी नोंदणी केली असून, या शाळांतील ७९ हजार ६३४ जागांवर प्रवेश दिला जाणार आहे. दरम्‍यान, लवकरच प्रवेशप्रक्रिया सुरू होणार असल्‍याने पालकांनी कागदपत्रांची पूर्तता करून ठेवण्याच्‍या सूचना शिक्षण विभागाने दिल्‍या आहेत. तत्‍पूर्वी शाळांना नोंदणी प्रक्रिया पूर्ण करायची होती. शाळांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्‍याने शिक्षण विभागाने ही नोंदणी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी दोन वेळा मुदतवाढ दिलेली होती. ही वाढीव मुदत बुधवारी (ता. १०) संपली. सायंकाळी उशिरापर्यंत नाशिक जिल्ह्यातील ४४१ शाळांनी नोंदणी पूर्ण केलेली आहे. त्‍यासाठी चार हजार ४७९ जागा उपलब्‍ध करून दिल्‍या आहेत.

गेल्‍या वर्षीपेक्षा जागा कमीच 

गेल्‍या वर्षी राज्‍यभरात नऊ हजार ३३१ शाळांनी नोंदणी करताना एक लाख १५ हजार ४७७ जागा उपलब्‍ध केल्या होत्या. मात्र सायंकाळी उशिरापर्यंत उपलब्‍ध झालेल्‍या माहितीनुसार यंदा राज्‍यातून सात हजार २७१ शाळांनी नोंदणी केली असून, या शाळांतील ७९ हजार ६३४ जागा उपलब्‍ध केल्‍या आहेत. हे प्रमाण गेल्‍या वर्षीच्‍या तुलनेत कमी आहे. नाशिक जिल्ह्या‍चा विचार केल्‍यास गेल्‍या वर्षी सुमारे ४४७ शाळांमधील पाच हजार ३०७ जागा प्रवेशासाठी उपलब्‍ध केल्‍या होत्‍या. यंदा जिल्ह्यातील उपलब्‍ध जागांच्‍या संख्येतही घट झालेली आहे.

सोर्स : लोकमत


RTE Admission 2021 : Aurangabad RTE Admission Schedule Announce – आर्थिक दुर्बल व वंचित घटकातील विद्यार्थ्यांसाठी खासगी शाळेत राखीव असलेल्या २५ टक्के जागांसाठी यंदा एकच सोडत निघणार आहे. प्राथमिक शिक्षण संचालनालयाने प्रवेशाबाबतचे संभाव्य वेळापत्रक जाहीर केले आहे. शिक्षणाचा हक्क कायद्याअंतर्गत (आरटीई) खासगी इंग्रजी शाळांमध्ये राखीव जागांवर प्रवेशासाठी पात्रताधारक शाळांना ३० जानेवारीपर्यंत नोंदणी करता येणार आहे. पात्रता असूनही नोंदणी न करणाऱ्या शाळांवर शिक्षण विभागाकडून कारवाई करण्यात येणार आहे.

आरटीईअंतर्गत दरवर्षी दुर्बल घटकातील २५ टक्के विद्यार्थ्यांना खासगी शाळांत प्रवेश दिला जातो. यंदा प्रवेशासाठी नऊ फेब्रुवारी २०२१ पासून ऑनलाइन अर्ज भरता येतील. वेळापत्रकानुसार नऊ ते २६ फेब्रुवारीदरम्यान पालकांना अर्ज करायचे आहे. पाच मार्चला जागांची लॉटरी निघेल. अर्ज निवडलेल्या पालकांनी नऊ ते २६ मार्च २०२१ दरम्यान कागदपत्रांची पडताळणी करायची आहे. त्यानंतर प्रतीक्षा यादी जाहीर होईल. प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना चार टप्प्यांत प्रवेश घेता येईल.

यंदा एकच लॉटरी काढण्यात येणार असून शाळेच्या रिक्त जागेच्या संख्येइतकीच प्रतीक्षा यादी असेल. प्रतीक्षा यादी पूर्ण झाल्यावरही शाळेत जागा रिक्त असल्यास, अर्ज शिल्लक असल्यास पुन्हा सोडत काढून प्रवेश देण्यात येतील, असे प्राथमिक शिक्षण संचालनालयाचे संचालक द. गो. जगताप यांनी परिपत्रकाद्वारे जाहीर केले आहे.

…तर संस्थावर कारवाई

आरटीई प्रवेश प्रक्रियेदरम्यान अनेक संस्था, एनजीओ खोटी माहिती भरून पालकांची दिशाभूल करतात. या संस्था, एनजीओ मुलांना प्रवेश मिळवून देण्यासाठी खोटा पत्ता, शाळेजवळ घर असल्याचे भासवतात. अशा तक्रारी आल्यास संबंधित संस्था, एनजीओविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे प्राथमिक शिक्षण संचालनालयाने स्पष्ट केले आहे.

संभाव्य वेळापत्रक – RTE Admission 2021

  • – ८ फेब्रुवारी : शाळांची नोंदणी
  • – ९ ते २६ फेब्रुवारी : प्रवेश अर्ज भरणे
  • – ५ ते ६ मार्च : ऑनलाइन सोडत
  • – ९ ते २६ मार्च : प्रवेश निश्चिती
  • – २७ मार्च ते ६ एप्रिल : प्रतीक्षा यादी- पहिला टप्पा
  • – १२ ते १९ एप्रिल : प्रतीक्षा यादी- दुसरा टप्पा
  • – २६ एप्रिल ते ३ मे : प्रतीक्षा यादी- तिसरा टप्पा
  • – १० ते १५ मे : प्रतीक्षा यादी- चौथा टप्पा

सोर्स : सकाळ

The post आरटीईअंतर्गत जिल्ह्यात चार हजार 479 जागा उपलब्‍ध appeared first on महाभरती...

Source linkPost Views:
6Source link